
भरधाव कंटेनरचालकाने बेदरकारपणे वाहन चालवून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हडपसर सिग्नलजवळ घडला.
लक्ष्मण सिद्धप्पा बाके (वय 48, रा. हडपसर ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अन्नपूर्णा बाके (वय 41 ) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास लक्ष्मण दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे खाली पडल्यामुळे लक्ष्मण गंभीररित्या जखमी झाल्यामुळे ठार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.
























































