फुरसुंगीत हातभट्टी दारूची चोरून विक्री, युट्यूब चॅनेलच्या पत्रकारासह कुटुंबाविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुरसुंगी परिसरात हातभट्टी दारूची चोरून विक्री करणाऱ्या युट्युब चॅनेलच्या पत्रकारासह संपुर्ण कुटुंबाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 12 हजार 700 रुपयांची 145 लीटर दारू जप्त करण्यात आली. राहुल मचिंद्र हरपळे (वय 33), सुचिता राहुल हरपळे (वय 30), नंदा मचिंद्र हरपळे (वय 55), मचिंद्र गुलाब हरपळे (वय 61, सर्व रा. चंदवाडी, फुरसुंगी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगीत हातभट्टी दारूची चोरून विक्री होत असल्याची माहिती हडपसर पोलिसाना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता, राहुल हरपळे यांच्या घरात देशी हातभट्टी दारूचे 145 लीटर दारू आढळून आली. कारवाई करताना राहूलने मी पत्रकार आहे, माझी पत्नी वकील आहे, तुमच्या वरिष्ठांना तक्रार करतो अशी धमकी दिली. देशी हातभट्टी दारूचा साठा आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यामुळे हरपळे कुटुंबातील सदस्य विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप गाडे करीत आहे.