
लॉकडाउनमुळे काम न मिळाल्याने नैराश्यातून 21 वर्षीय नृत्यांगनाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी हडपसरमध्ये घडली. विशाखा काळे असे आत्महत्या केलेल्या नृत्यांगनाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विशाखा नृत्यांगना होत्या. वेगवेगळ्या ठिकाणी त्या नृत्याचे शो करत उदरनिर्वाह करीत होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांचा अपघात झाल्याने त्यांच्या चेहऱ्याला जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना शो करता येत नव्हते. त्यांचे फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याचे स्वप्न होते. मात्र, अपघात झाल्यामुळे त्यांना घरीच बसावे लागले. त्यातच लॉकडाऊन झाल्यामुळे त्यांचे कार्यक्रम कमी झाल्यामुळे त्या नैराश्यात होत्या. हडपसरमधील गोंधळे नगरमध्ये त्या कुटूंबियासह राहत होत्या.



























































