
कोरोना कालावधीत दिवसरात्र रस्त्यावर काम करणाNया पोलिसांचा उत्साह वाढविण्यासाठी मराठी कलाकारांनी ठिकठिकाणी जाउन पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे मनोबल वाढविले. कलाकारांनी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बंदोबस्तावर असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. कलाकारांनी काल पावसात पोलिसांसोबत रस्त्यावर उभे राहून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. त्याशिवाय आज कलाकारांनी वडगाव पूल आणि नवले पूल परिसरातील पोलिसांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, राहूल सोलापूरकर, आनंद इंगळे, संस्कृती बालगुडे, आशा देशमुख, सौरभ राव, रात्रीस खेळ चाले मालिकेतील आण्णा नाईकची भूमिका करणारे माधव अभ्यंकर मराठी कलाकारांनी सिंहगड रोड व दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नाकाबंदीच्या ठिकाणी जाऊन सदिच्छा भेट दिली. दांडेकर पुल परिसरात मंगळवारी मराठी कलाकारांनी भर पावसात कलाकरांनी नाकाबंदीच्या ठिकाणी थांबून पोलिस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला. सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव पुल व नवले पूल येथील नाकाबंदीच्या ठिकाणी काम करणाऱ्या पोलिसांसह उपस्थित नागरिकांसोबत कलाकारांनी संवाद साधला. स्वतः व कुटुंबियांचा न विचार करता पोलीस चोवीस तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी करत असलेल्या कामाबद्दल कौतुक केले. पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी थांबून मराठी कलाकारांनी नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन केले.
”कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वातही पोलिसांकडून नाकाबंदीला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यापाश्र्वभूमीवर मराठी कलाकारांनी नाकाबंदीदरम्यान पोलिसांना भेट दिली. दिवसरात्र रस्त्यावर काम करणाऱ्या पोलिसांचे त्यांनी कौतूक केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांमध्ये काम करण्यास आणखी उत्साह निर्माण झाला आहे.” – विजय खोमणे, पोलीस निरीक्षक दत्तवाडी पोलिस ठाणे























































