
नात्यातील पाच वर्षीय चिमुरडीवर नात्यातील तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना कुंजीरवाडीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपी हा तक्रारदारांच्या मावस बहिणीचा मुलगा आहे. मागील महिन्यात तक्रारदार महिलेने पाच वर्षीय मुलीला मावस बहीणीकडे राहण्यासाठी ठेवले होते. त्यावेळी आरोपीने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले.
प्रकरणाबद्दल कोणाला काही सांगितल्यास तुझ्या आईला कापून टाकीन, अशी धमकीही त्याने दिली होती. मुलीच्या पोटात त्रास होऊ लागल्याने तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर अत्याचाराची घटना उघडकीस आली. लोणी काळभोर पोलीस तपास करत आहेत.




























































