
देशभरातील हजारो धावपटूंचा सळसळता उत्साह… परदेशी धावपटूंची घटलेली संख्या… भल्यापहाटेचे आल्हाददायक वातावरण… यंदाचा नवीन सुटसुटीत मार्ग… आणि देशातील मॅरेथॉनची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱया 34 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सलग तिसऱया वर्षी इथिओपियन धावपटूंचाचा बोलबाला बघायला मिळाला. पूर्ण मॅरेथॉन (42 किलोमीटर) आणि अर्ध मॅरेथॉन (21 किलोमीटर) या दोन्ही शर्यतींमध्ये इथिओपिन धावपटूंनीच निर्भेळ यश संपादन केले. फक्त महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये केनियाच्या गथेरू हन्नाह हिने तिसरा क्रमांक पटकावला हा एक अपवाद ठरला. सोलोमन टेकाने 2 तास 18 मिनिटांत पुणे मॅरेथॉन जिंकली. महिला गटात यियेझू बेलायनेश शिफेरा हिने 2 तास 44 मिनिटे 1 सेकंद वेळेसह बाजी मारली. अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात हेन्री हल्लू इटिक्लाने 1 तास 6 मिनिटे 3 सेकंद वेळेसह शर्यत जिंकली, तर महिलांत गाशू सम्रावित नेगा हिने 1 तास 17 मिनिटे 6 सेकंद वेळेसह अव्वल क्रमांक पटकावला.
हिंदुस्थानी मॅरेथॉनचे हे 100 के कर्ष होय. प्रत्येक डिसेंबरच्या पहिल्या रविवारी ही स्पर्धा होत असते. पहाटे पाच काजता कै. बाबुराक सणस मैदानावरून यंदाच्या पुणे मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. यावेळी माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते मुख्य शर्यतीला (42.195कि.मी.) झेंडा दाखविण्यात आला. यावेळी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे किशकस्त अभय छाजेड, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रोहन मोरे, उपमहापौर सरस्कती शेडगे, स्पर्धा संयोजन सचिक सुमंत काईकर, गुरुबन्स कौर, सचिन आडेकर आदी मान्यकर उपस्थित होते. उपमहापौरांनी अर्धमॅरेथॉनला झेंडा दाखविला. त्यानंतर अर्ध मॅरेथॉन (21 किलोमीटर), 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि साडे तीन किलोमीटरची चॅरिटी रन सोडण्यात आली. याप्रसंगी रुदांग ढोल ताशा पथकाचे कादन, तसेच किभरत डान्स अकादमी यांची गणेशकंदना सादर करण्यात आली.
अखेरच्या साडेतीन ते चार किलो मीटरच्या टप्प्यात सोलमन टेकाने अब्दू केबेबेला पिछाडीवर टाकत धावण्याचा वेग वाढविला. अखेरच्या टप्प्यासाठी राखून ठेवलेल्या उर्जाचा वापर करत सोलमनने अब्दू केबेबे पुढे जाणार नाही, याची खबरदारी घेत दोन मिनिटांच्या फरकाने ही शर्यत जिंकली.

























































