पुणे – मार्केटयार्ड वाहन तोडफोड प्रकरणी आरोपीला स्वारगेट पोलिसांनी केली अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहशत माजविण्यासाठी मार्केटयार्ड परिसरात 41 वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. तेजस रामलाल यादव (वय 20) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

स्वारगेट तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस शिपाई ज्ञाना बडे, मनोज भोकरे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मार्केटयार्ड परिसरात वाहनांची तोडफोड केलेल्या टोळीतील एकजण गुलटेकडी परिसरात येणार असल्याची माहिती असताना सचिन कदम, ज्ञाना बडे आणि मनोज भोकरे यांना मिळाली.

त्यानुसार पथकाने सापळा तेजस यादव याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने वाहनांची तोडफोड केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून मार्केटयार्ड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, सचिन कदम, ज्ञाना बडे, मनोज भोकरे , विजय कुंभार विजय खोमणे, संदीप साळवे सोमनाथ कांबळे, ऋषिकेश तिथमे, लखन धावरे, सचिन दळवी, वैभव शीतकाळ, अमित शिंदे, सचिन दळवी यांच्या पथकाने केली आहे.