मेट्रोचे बांधकाम साहित्य चोरणार्‍या टोळीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेट्रो ट्रॅकच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे लोखंडी साहित्य चोरी करणार्‍या टोळीला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये एका महिलेचा सहभाग असून आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

दीपक पांडुरंग इदवे (वय 28, रा. पिंपरी, मोरवाडी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दिनेश प्रधान (वय 22, रा. सोमेश्वरवाडी ) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश हे मेट्रो ट्रॅक बांधकाम ठिकाणी सुरक्षा मार्शल आहेत. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो पिलरचे काम सुरू असताना दीनेश पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी रिक्षातून आलेल्या दोघांसह इतर साथीदारांनी बाणेर रस्ता परिसरातून 200 किलो लोखंडी वजनाचे पाईप चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा मार्शल दिनेश यांनी इतरांच्या मदतीने दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.