पुणे – लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अश्लील फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

प्रातिनिधिक फोटो

मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्यासोबत लग्न करेन असे आमिष दाखवून तरूणाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अनिल म्हेत्रे (वय 22, रा. धानोरी) याच्याविरूद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिलने फिर्यादी अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडविले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या लॉजवर नेउन शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या