एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली, संतप्त उमेदवारांचे पुण्यात आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - चंद्रकांत पालकर

एमपीएससी परीक्षा पुढे ढकल्याने पुण्यात या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या संतप्त उमेदवारांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. उमेदवारांनी शास्त्री रस्त्यावर रास्ता रोको करत ही परीक्षा स्थगित न करता रविवारीच घेण्याची मागणी केली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने राज्य सेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली. ही परीक्षा 14 मार्चला होणार होती.अवघ्या दोन दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली.

उमेदवारांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. परीक्षा झालीच पाहिजे, परीक्षा रद्द केली जाऊ नये अशी मागणी विदयार्थ्यांनी केली. उमेदवार मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने त्यांना पांगवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. पण विद्यार्थी मागे हटायला तयार नव्हते. त्यामुळे शास्त्री रस्ता काही वेळ बंद ठेवण्यात आला.

pune-mpsc

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवारी 14 मार्च 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या निर्देशांनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. कोविड – 19 विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे.

दरम्यान, ही परीक्षा एक-दोन नव्हे तर आतापर्यंत पाच वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. 2020 मध्ये ही पूर्व परीक्षा होणार होती. पण कोरोना संक्रमण स्थितीमुळे ही पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले.