नवले ब्रिजजवळ टेम्पो उलटला, 8 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील कात्रज चौक ते नवले ब्रिजदरम्यान अपघाताची मालिका कायम असल्याचे दिसून आले आहे. हळदी सोहळ्यासाठी चाललेला एक भरधाव टेम्पो पलटी झाल्याची घटना आज रात्री आठच्या सुमारास नवले ब्रिजजवळ घडली आहे. अपघातात 8 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

कात्रजकडून नवले ब्रिजकडे टेम्पोचालक काही नागरिक घेऊन हळदी समारंभाला जात होता. डी-मार्टच्या समोर आल्यानंतर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला टेम्पो पलटी होऊन कोसळला. त्यामुळे टेम्पोतील 8 जण जखमी झाले आहेत.

टेम्पोतुन जाणारे नागरिक हळदीच्या कार्यक्रमाला जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. अपघातानंतर परिसरात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक कर्मचारी आणि पोलीस कोंडी सोडविण्याचे प्रयत्न करीत होते. अपघातात जखमी झालेल्याना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.