Pune News – इंदापूरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; ओढ्याला पूर, घरात पाणी शिरले, जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसाने पुणे जिल्ह्याला झोडपून काढले आहे. इंदापूर तालुक्यातील मदनवाडी परिसरात रविवारी सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे भिगवण-बारामती रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याला पूर आला आहे. संपूर्ण परिसर जलमय झाला असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये, वाड्या-वस्त्यांवर जाणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे अनेक गावांचा व वाड्यावस्तींचा संपर्कही तुटला आहे.

बारामतीत नीरा डाव्या कालव्याला भगदाड

मुसळधार पावसामुळे बारामती तालुक्यातील लिमटेक परिसरात नीरा डावा कालवा फुटला. अतिवृष्टीमुळे पाण्याचा दाब वाढल्याने कालव्याला भगदाड पडले. यामुळे कालव्यातील पाणी घरांसह शेतात घुसले. बारामती परिसारत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.