नीलेश घायवळ टोळीची पोलिसांनी काढली धिंड

रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्या तरुणाने दुचाकीला जाण्यास रस्ता दिली नाही, यावरून झालेल्या वादावादीतून सराईत निलेश घायवळ टोळीतील साथीदारांनी एकावर गोळीबार केला. त्यामुळे संबंधित तरुण गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी सहभागी असलेल्या आरोपींना ताब्यात घेऊन कोथरूड पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे. मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक ऊर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर ऊर्फ अंड्या, दिनेश फाटक अशी धिंड काढलेल्या आरोपींची नावे आहेत. कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील साथीदारांनी बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास तरुणावर गोळीबार केला. हल्ल्यात प्रकाश धुमाळ हे जखमी झाले होते. त्यानंतर आरोपींनी वैभव साठे याच्यावर कोयत्याने वार करून त्याला जखमी केले होते.