पुण्यातील पासोड्या विठोबा मंदिरात चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील बुधवार पेठेत असलेल्या शिवकालीन पासोड्या विठोबा मंदिरात चोरट्यांनी शनिवारी रात्री डल्ला मारला. चोरांनी मंदिरांतील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेली आहे.

दैनंदिन पुजाविधीसाठी पहाटे मंदिर उघडायला आलेल्या पुजाऱ्यांना मंदिराचा दरवाजा तोडलेला दिसला. मंदिरातील काही दानपेट्या फोडलेल्या होत्या.