पुणे- पाटील इस्टेटमध्ये स्वंयघोषित दादाचा कोयत्याने राडा, दोघांवर वार

प्रातिनिधिक फोटो

जुन्या भांडणाच्या रागातून पाटील इस्टेट परिसरातील स्वयंघोषीत दादाने हातात कोयता घेऊन दोन तरूणांवर वार केल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

याप्रकरणी अक्षय पवार (वय 26) मिरा शंकर कांबळे (वय 30, रा. पाटील इस्टेट) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आकाश हनवल (वय 25) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय, मिरा आणि आकाश पाटील इस्टेट परिसरात राहतात. त्यांचे किरकोळ कारणावरून वाद झाले होते. दोन दिवसांपूर्वी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अक्षय आणि मीरा पाटील इस्टेट परिसरात आले.

अक्षयने हातात कोयता घेउन मी पाटील इस्टेटचा दादा आहे असे म्हणत आकाशला  तुला लय माज आला आहे. तुझा माज उतरवते, तुझी विकेटच काढतो, असे म्हणत त्याच्या मागे धावला. त्याच्यावर कोयत्याने  वार केले. भांडण सोडवण्यास आलेल्या दादा दुबळे तरूणावरही अक्षयने वार करून जखमी केले. याप्रकरणी खडकी पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या