पुणे हादरले! कुऱ्हाडीने मारहाण करीत पेट्रोलपंपावर दरोडा, भूमकर चौकातील घटनेने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल पंपावरील सुरक्षा रक्षकाला कुऱ्हाडीने मारहाण करीत दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री नऱ्हेतील भूमकर चौकाजवळ असलेल्या व्ही.के. डी. पेट्रोलपंपावर घडली. दरोडेखोराच्या मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. घटनेत तिघे जण जखमी झाले आहेत. चोरट्यांनी येथून 20 हजारांची रोकड चोरुन नेली. याची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, मागील दोन दिवस शहरात गोळीबार आणि आता दरोड्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.