Pune Porsche Accident : ससून रुग्णालयाचे डिन विनायक काळेंना सक्तीच्या रजेवर पाठवले

पुण्यातील पोर्शे हिट अँड रन घटनेतील ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना वैद्यकीय शिक्षण विभागाने निलंबीत केल्यानंतर आता ससून रुग्णालयाचे डिन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या चौकशी अहवालात ही शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर डॉ काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आता विनायक काळेंच्या जागी ससूनचा अतिरिक्त कारभार डॉक्टर चंद्रकांत म्हस्केंकडे सोपवण्यात आला आहे.

दोन डॉक्टर व एक वॉर्डबॉय निलंबीत

बुधवारी या प्रकरणी ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांनी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि वॉर्डबॉय अतुल घटकांबळे या तिघांना निलंबित केले. ल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप झाला होता. यानंतर चौकशी समितीने तपास केला. त्यानंतर आज ही तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.