Pune Porsche accident – ‘तो’ व्हिडीओ माझ्या मुलाचा नाही, ढसाढसा रडत शिवानी अग्रवाल यांनी पोलिसांना केली विनंती

पुण्यातील कल्याणीनगर हिट अॅण्ड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचा एक रॅपचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात तो शिवीगाळ करत अर्वाच्च भाषेत बोलताना दिसत आहे. त्यामुळे लोकांमध्ये त्याच्याविषयी संताप आणखी वाढला असून नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. अशातच वेदांतची आई शिवानी अग्रवाल यांनी एक व्हिडीओ शेअर करुन ढसाढसा रडत तो वेदांतचा व्हिडीओ नसून पोलिसांना विनंती केली आहे.

शिवानी अग्रवाल यांनी सोशल मीडियावर एक व्हि़डीओ शेअर केला आहे. त्यात त्या म्हणाल्या, ” रॅप गाण्याचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो माझ्या मुलाचा नाही. तो फेक व्हिडीओ आहे. माझा मुलगा बाल सुधार कारागृहात असे सांगत ढसाढसा रडत प्लीज माझ्या मुलाला वाचवा” अशी विनंती पुण्याच्या पोलीस आयुक्तांना केली आहे.

गुरुवारी वेदांतचा एक रॅप गाण्याच्या व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात त्याने शिवीगाळ करत अर्वाच्च भाषेत बोलताना दिसल्याने लोकांच्या मनात त्याच्याविषयी असंतोष वाढला आणि याला अजिबात पश्चाताप झाला नसल्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. मात्र आता त्याची आई शिवानी अग्रवाल यांनी व्हिडीओ शेअर करत तो माझ्या मुलाचा व्हिडीओ नव्हे असे स्पष्टीकरण दिले आहे.