शहरातील जंगली महाराज रस्त्यावर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या दोघा सराईतांना गुन्हे शाखेच्या एक पथकाने अटक केले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि चार काडतुसे असा 1 लाख 24 हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. आदित्य रणजीत चंदेल (वय 21) आणि दत्ता उर्फ राजेश भास्कर इंगळे (वय 22 दोघेही रा. आंबेगाव खुर्द ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपी आदित्य चंदेल व दत्ता इंगळे यांच्याकडे पिस्तूल असून ते गुन्हा करण्याच्या उद्देशाने जंगली महाराज रस्त्यावर थांबल्याची माहिती सचिन जाधव यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि चार जिंवत काडतुसे असा 1 लाख 24 हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, सतीश भालेकर, विजयसिंह अशोक माने, अजय थोरात, योगेश जगताप, सचिन जाधव इमरान शेख, अय्याज दड्डीकर, शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, प्रशांत गायकवाड यांच्या पथकाने केली.


























































