पुण्यात रेस्टॉरेण्टमध्ये सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने जिवीतहानी नाही

प्रतिकात्मक छायाचित्र

रविवारी हडपसरमधील सातववाडी भागातील एका रेस्टॉरंटमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्फोटानंतर लागलेल्या आगीतून सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या आगीत रेस्टॉरंटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे 3.12 वाजता एका इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या भन्नाट बिर्याणी नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर काळे बोराटे नगर आणि हडपसर अग्निशमन केंद्रातील दोन टेंडर्स तैनात करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या तोपर्यंत स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

ज्यावेळी अग्निशमन दल घटनास्थळी पोहेचले त्यावेळी सहा जणं रेस्टॉरेण्टच्या वरच्या अपार्टमेण्टमध्ये अडकले असल्याचे दिसले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवून त्या सहा जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. यात तीन पुरुष आण तीन महिलांचा समावेश होता. अग्निशमन दलाने रेस्टॉरंटमधून तीन गॅस सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर आणले . स्फोट झालेला एक सिलिंडर स्वयंपाकघरात सापडला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.