कऱ्हा नदीवरच्या पुलाचा भाग खचला, पुणे-पंढरपूर वाहतुकीला फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pune saswad road karha river bridge rain update

पुण्याप्रमाणेच सासवडमध्येही बुधवारी रात्री अतिवृष्टी झाली. या मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीवर असलेला पूल खचला आहे. प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की बुधवारी रात्री झालेला पाऊस हा ढगफुटीप्रमाणे होता. तुफानी वेगाने पडणाऱ्या या पावसामुळे बुधवारी रात्री साडेअकरा नंतर कऱ्हा नदीच्या मुख्य पुलावरून पाणी वाहायला सुरुवात झाली होती.

पुलावरून पाणी जायला सुरुवात झाल्याने इथली वाहतूक थांबवण्यात आली होती. या पुलाची निर्मिती झाल्यानंतर म्हणजे 1967पासून आजपर्यंत ही पहिली वेळ आहे की पुलावरून इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी वाहात होते.  पाण्याच्या वेगामुळे हा पुलाचा काही भाग खचला असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुलाचा भाग खचल्याने इथली वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पुण्याहून पंढरपूरकडे आणि पंढरपूर तसेच बारामतीवरून पुण्याकडे येणाऱ्या वाहनचालकांनी सासवड मार्गे प्रवास करणे टाळावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.