शंकरशेठ परिसरातील फ्लॅटमधून दोन लाखांची चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शंकर शेठ रस्त्यावरील रामकृष्ण अपार्टमेंट येथे उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून रोख रक्कम व दागिने असा 1 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकेत यादव (वय 20, रा. शंकरशेठ रोड) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,साकेत शंकरशेठ रस्त्यावरील रामकृष्ण अपार्टमेंटमध्ये भावासोबत राहतात. बुधवारी मध्यरात्री त्यांचे भाऊन घरात झोपले होते. त्यांच्याकडून घराचा दरवाजा उडला राहिला. त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी बेडरुमच्या कपाटाचे दरवाजे तोडून कपाटातील रोख 50 हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा 1 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी स्वारगेट पोलिस अधिक तपास करत आहेत.