
मंत्रालयात मेट्रोविभागासह लोन मंजूर करून देण्याच्या आमिषाने फसवणूक एकाला जीवावर बेतली आहे. आरोपींनी दीड वर्षांनंतर संबंधिताचा शोध घेऊन बेदम मारहाण करीत त्याचा खून केला. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट तीनने अवघ्या 10 तासांच्या आतमध्ये खूनाची उकल करीत टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सुनिल नलावडे असे खून झालेल्याचे आहे. याप्रकरणी महेश शंकरराव धुमाळ (वय – 32, रा. पिंपळे खालसा), हिवरे कुभार (पदमावती वस्ती, ता. शिरुर), शिवराज किशोर प्रसाद सिंह (वय – 32, रा. मोहितेवाडी, पोस्टा-वडगाव, ता-मावळ), शिवाजी रंगाप्पा तुमाले (वय – 56, रा. गंगानगर, फुरसुंगी), अक्षय पोपट आढाव (वय- 22, रा. सिरापुर, ता. पारनेर, जि. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सुनीलने ओळखीतील कुर्डेकर दाम्पत्याच्या मदतीने महेशला मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखविले होते. त्याशिवाय लोन मंजूर करण्यासाठी काही जणांकडून रक्कम उकळली होती. त्यानंतर दीड वर्षांपासून तो फरार झाला होता. तीन दिवसांपूर्वी सुनील हा वनिता कुर्डेकर हिच्या घरी आल्याची माहिती आरोपी महेश धुमाळ याला मिळाली. त्याने फसवणूक झालेल्या इतर साथीदारांना बोलावून सुनीलला नऱ्हेत जाऊन बेदम मारहाण करून खून केला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट तीनने तळेगाव दाभाडे, फुरसुंगी, सिरापुर, ता. पारनेरमधून चौघांना ताब्यात घेतले. त्यांचा मोबाईल मोटार असा 5 लाखांचा ऐवज जप्त केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस उपनिरीक्षक, अजितकुमार पाटील, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, रामदास गोणते, सुजित पवार, संजीव कंळबे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर यांनी केली.























































