Weather Update – पुणे सर्वाधिक कुल; तापमान 8.6 अंश

पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून किमान तापमानाच्या पाऱ्यात सातत्याने घसरण होत असून, आज (दि. 25) शहरात 8.6 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील किमान तापमान 9 अंशांपर्यंत घसरण झाली होती. मात्र, आज प्रथमच जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा 9 अंशांच्या आतमध्ये आल्याने पुणे जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. नाशिकमध्येदेखील आज 8.6 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड

वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला असून, काही शहरांतील किमान तापमान 9 अंशांच्या आतमध्ये नोंदविले गेले आहे.

राज्यभरात किमान तापमान घसरले

राज्यातदेखील थंडीचा कडाका वाढला असून, काही शहरांतील किमान तापमान 10 अंशांच्या आतमध्ये नोंदविले गेले आहे. राज्यातील जळगाव येथे 9.3, मालेगाव येथे 9.4, छत्रपती संभाजीनगर येथे 9.4, परभणी येथे 10.9, अकोला येथे 9.5, बुलढाणा येथे 10, गोंदिया येथे 9.5, नागपूर येथे 8.7, यवतमाळ येथे 9 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली.