मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव मोटारचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना हडपसरमधील शेवाळेवाडी फाटा परिसरात घडला. हा अपघात रविवारी सकाळी नऊच्या सुमारास झाला असून याप्रकरणी मोटारचालकाला हडपसर पोलिसांनी अटक केले आहे.

नागसेन विश्वंबर नागटिळक (वय ४४, रा. बी. टी. कवडे रस्ता)  असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मोटारचालक अनिल मांढरे (वय ५१, रा. महादेवनगर, मांजरी ) याला अटक करण्यात आली आहे. केतन सवाणे (वय २३) यांनी फिर्याद दिली आहे.

नागसेन एका खासगी कंपनीत कामाला होते. रविवारी सकाळी ते दुचाकीवरून शेवाळेवाडी फाटा परिसरातून थेउरकडे चालले होेते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात मोटार चालवून अनिलने  त्यांना धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे नागसेन यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मनोज पाटील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या