पंजाब आणि जम्मूमधील अनेक रेल्वे रद्द, सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाचा निर्णय

पाकिस्तानसोबत वाढत्या तणावात हिंदुस्थानी रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने जम्मू आणि पंजाबमधील सीमावर्ती भागात धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. अमृतसर, भटिंढा, फिरोजपूर आणि जम्मू भागात धावणाऱ्या गाड्यांचे फेरनियोजित केल्या आहेत. या भागात धावणाऱ्या गाड्या फेरनियोजित करून सकाळी चालवल्या जातील. तर छोट्या पल्ल्याच्या गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार अमृतसर, जम्मू आणि फिरोजपूर भागात ज्या ट्रेन रात्री पोहोचत होत्या त्या आता सकाळी पोहोचतील. या निर्णयामुळे 15 हून अधिक गाड्यांना फटका बसेल. असे असले तरी प्रवाशांसाठी दिवसा विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. दिवसा ज्या गाड्या धावत होत्या त्या तशाच धावतील.