नवज्योतसिंग सिद्धू यांचा राजीनामा स्वीकारला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांचा राजीनामा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी स्वीकारला आहे. सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा सूपूर्द केला होता. त्यानंतर ट्विटरवर आपण राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले होते. अमरिंदरसिंग यांनी सिद्ध यांचा राजीनामा मंजूर करून राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवला आहे.

आपण 10 जूनला मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे सिद्धू यांनी ट्विटरवर स्पष्ट केले होते. मात्र, अजूनपर्यंत सिद्धू यांचा राजीनामा आपल्याला मिळाला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. आपल्याला सिद्धू यांच्या राजीनाम्याचे पत्र मिळाले असून दिल्लीहून परतल्यावर त्यावर निर्णय घेऊ असे अमरिंदरसिंग यांनी मंगळवारी स्पष्ट केले होते. त्यांनी राजीनामा स्वीकारला असून राज्यापालांच्या मंजुरीसाठी पाठवला आहे.