पंजाबमध्ये कोण असेल काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? ‘या’ दिवशी राहुल गांधी करू शकतात घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच राजकीय पक्ष आपली पुर्ण ताकद लावून मैदानात उतरले आहेत. अशातच काँग्रेस आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कधी जाहीर करणार, याकडेच अनेकांचं लक्ष लागले आहे. याचदरम्यान ‘एबीपी’ न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, काॅंग्रेस येत्या 6 फेब्रुवारी रोजी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करू शकते. काँग्रेस मुख्यामंत्रीपदाच्या शर्यतीत पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी हे सध्या आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा, यासाठी काँग्रेस पंजाबमध्ये सर्वेक्षण करत आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याच्या शर्यतीत काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंग सिद्दु हे देखिल सामिल असून ते चिन्न यांना टक्कर देताना दिसत आहे. अलिकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात जालंधर येथे एक सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री चन्नी आणि सिद्धू हे दोघेही सामिल झाले होते. यावेळी या दोघांनीही राहुल गांधी यांच्याकडे पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी केली होती.

काँग्रेसमधील मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याच्या प्रश्नाबाबत सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केले होते. काँग्रेसने पंजाब निवडणूक कोणाच्या चेहऱ्यावर लढावावी? या प्रश्नावर 40 टक्के लोकांनी चरणजित सिंग चन्नी यांना पसंती दर्शवली होती. तर 21 टक्के लोकांनी सिद्धु यांच्या चेहऱ्यावर काँग्रेसने ही निवडणुक लढवावी, म्हणून सांगितल होत. 27 टक्के लोकांनी या दोघांच्याही नावाला नापसंती दर्शवली होती. तसेच 12 टक्के लोकांनी माहित नसल्याचे सांगितले होते. दरम्यान, पंजाब विधानसाभा निवडणुकीत काँग्रेस कोणाला आपल्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवणार हे 6 फेब्रुवारी रोजी समजणार आहे.