पंजाबमध्ये लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

472

जर लॉकडाऊन वाढवला नाही तर कोरोनाचे संकट वाढू शकते अशी भिती पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंह यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन वाढण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवायचा की नाही यावर पंजाबचे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊनचा अवधी 30 एप्रिल पर्यंत वाढवला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आरोग्य विभागाने केल्लेल्या शिफारसींसुनार राज्यात कर्फ्यूचे नियम आणखी सक्तीने राबवण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. तसेच लॉकडाऊनदरम्यान राज्यातील उद्योग पुन्हा सुरू करण्यावर निर्णय  होऊ शकतो. पंजाबमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 130 रुग्ण आढळले आहेत. तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या