पुष्कर-सोनालीची हॅटट्रिक

‘ती आणि ती’ तसेच ‘तमाशा लाइव्ह’ या चित्रपटानंतर पुष्कर जोग आणि सोनाली कुलकर्णी तिसऱयांदा एकत्र झळकणार आहेत. आगामी ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहे. यानिमित्ताने जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.

या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. ‘ती आणि ती,’ ‘वेल डन बेबी’ चित्रपटाच्या यशानंतर आनंद पंडित मोशन पिक्चर्स एलएलपी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट यांनी ‘व्हिक्टोरिया’ची निर्मिती केली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून स्कॉटलंडमध्ये चित्रपटाचे शूटिंग होणार आहे.