‘पुष्पा-2’ येतोय… शूटिंगचा श्रीगणेशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘पुष्पा द राईज’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्सदेखील तुफान हिट झाले. तेव्हापासूनच ‘पुष्पा 2’ हा चित्रपट कधी येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची ही उत्सुकता आता लवकरच संपणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या सिक्वेलच्या शूटिंगला सुरुवात झाली असून सेटवरील एक पह्टो व्हायरल होतोय. श्रीवल्लीची भूमिका साकारणारी रश्मिका हिनेदेखील हा पह्टो ट्विटरवर शेअर केला आहे. 2023 च्या अखेरीस पुष्पा 2 हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटात विजय सेतूपती हादेखील खलनायकाच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे.