मी झेलेन्स्की यांना नक्कीच भेटेन, युद्धादरम्यान पुतिन युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्यास झाले तयार

रशिया-युक्रेन युद्धाला आता जवळपास चार वर्षे पूर्ण होत असताना, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना थेट भेटण्याची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने ही भेट आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

याबाबत माहिती देताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दावा केला आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी फोनवर बोलताना हे सांगितले. रुबियो म्हणाले की, तीन वर्षांच्या युद्धानंतर झेलेन्स्की यांना भेटण्याची पुतिन यांची तयारी दर्शवली, ही मोठी गोष्ट आहे.

मार्को रुबियो म्हणाले की, दोघांच्या भेटीनंतर युद्ध संपेल, पण किमान दोन्ही नेते एकमेकांशी बोलत आहेत, ही एक मोठी गोष्ट आहे. रुबियो पुढे म्हणाले की, आम्ही पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यात बैठकीसाठी काम करत आहोत. जर दोन्ही नेते एकमेकांशी बोलण्यास सहमत झाले तर ही त्रिपक्षीय बैठक देखील असू शकते, जिथे ट्रम्प दोन्ही नेत्यांसोबत बसून युद्ध संपवण्यावर चर्चा करू शकतात.