सिंधूची पाचव्या स्थानावर घसरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

चीनमध्ये 12 ते 16 डिसेंबरदरम्यान होणाऱया बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल बॅडमिंटन स्पर्धेच्या मानांकनाच्या यादीत हिंदुस्थानच्या पी. व्ही. सिंधूची घसरण झाली आहे. या स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या मानांकनात सिंधू चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानी फेकली गेली आहे. गुरुवारी या स्पर्धेच्या मानांकनाची यादी जाहीर करण्यात आली.

कोरिया ओपन स्पर्धेची विजेती जपानची नोझोमी ओकुहराने तीन स्थानांनी झेप घेतली असून ताई झू यिंग आणि कॅरोलिना मरीन या दोघींचीही प्रत्येकी एका स्थानाने घसरण झाली आहे. त्यांना अनुक्रमे तिसऱया आणि चौथे स्थान प्राप्त झाले आहे. दरम्यान, जागतिक क्रमवारीतील दुसरे स्थान सिंधूने कायम राखले आहे. पुरुष एकेरीमध्ये हिंदुस्थानचा समीर वर्माला मानांकनात आठवे स्थान मिळाले असून आघाडीचे खेळाडू एच. एस. प्रणॉय आणि किदाम्बी श्रीकांत हे अव्वल 20 मानांकनात स्थान मिळवण्यात अपयशी ठरले आहे.