कोरोना झालेल्या महिलेने उगाच कपडे काढले, बॉडी सोप गटागट प्यायल्याचेही उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कतारमध्ये एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिने कोणत्याही कारणाशिवाय आपले कपडे काढले. यानंतर तिने अंगाला साबणाऐवजी लावण्यात येणारा बॉडी सोप गटागट प्यायला.  ही 30 वर्षांची असून ती दोहा येथे राहते. कोरोना होण्यापूर्वी तिला कोणताही मानसिक आजार नव्हता असं वैद्यकीय तपासणीतून समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. मात्र तापाशिवाय तिच्यात इतर कोणतीही तीव्र लक्षणे दिसत नसल्याने डॉक्टरांनी तिला रुग्णालयात न ठेवता घरी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. चार दिवस क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर ही महिला विचित्र वागायला लागली होती. तिला भ्रमिष्टपणाचे झटके येऊ लागले होते. हा भ्रमिष्टपणाचा झटका आल्याने एकेदिवशी तिने सर्वांसमोर स्वत:चे सगळे कपडे काढून टाकले होते. एके दिवशी तिने बॉडी सोपची संपूर्ण बाटली पिऊन टाकली. हे पाहिल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला तातडीने रुग्णालयात आणलं होतं.

बॉडी सोप पिण्याबद्दल जेव्हा तिच्या मानसोपचारत्ज्ञाने तिला प्रश्न विचारले तेव्हा तिने सांगितलं की स्वत:ला इजा पोहचवण्याचा तिचा अजिबात विचार नव्हता. बॉडी सोपचा वास आवडल्याने आपण ते पिऊन टाकलं असं या महिलेने मानसोपचारतज्ज्ञाला सांगितलं. या महिलेला डॉक्टरांनी तपासलं असता त्यांना लक्षात आलं की या महिलेची झोप अपूर्ण आहे. ही महिला सातत्याने काहीतरी बडबडत होती. समोर कोणीतरी आहे असा भास होत असल्याने ती लोकांशी बोलतेय असं वाटून एकटीच बडबडत असायची.  तिच्या घरामध्ये कोणालाही मानसिक आजार नसून तिला अंमली पदार्थांचे व्यसनही नसल्याचं डॉक्टरांना कळालं आहे. कोरोना आणि या मानसिक आजाराचा काही संबंध आहे का? याबाबत वैद्यकीय विश्वात सध्या चर्चा सुरू आहे. .