‘वी’ची गुणवत्तापूर्ण सेवा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘वी’ टेलिकॉम कंपनीला एप्रिल 2022 मध्ये इनडोअर आणि आऊटडोअर कॉल क्वालिटी रेटिंगमध्ये 1 ते 5 पैकी सरासरी 4.1 रेटिंग मिळाले असून गुणवत्तापूर्ण आवाजाची सेवा दिली आहे, असे टीआरएआयच्या मायकॉल डेटाच्या निष्कर्षात म्हटले आहे. ‘वी’ने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2022 मध्येदेखील एकंदरीत कॉल रेटिंग्स तसेच इनडोअर आणि आऊटडोअर कॉल्सचा सर्वाधिक स्कोर कायम राखत व्हॉइस कॉल्सच्या उच्च गुणवत्तेमध्येदेखील सातत्य राखले आहे. जानेवारी आणि एप्रिल 2022 दरम्यान 4 आणि त्यापेक्षा जास्त रेटिंग्स मिळवणारी ‘वी’ ही एकमेव खासगी टेलिकॉम कंपनी आहे. टीआरएआयच्या मायकॉल पोर्टलवरील माहिती ही देशभरातील मोबाईल युजर्सकडून करण्यात आलेल्या टीआरएआय मायकॉल ऍप्लिकेशनच्या वापरावर आधारित असते.