हिंदुस्थानात क्वांटम कॉम्प्युटर लाँच होणार, आयबीएम-टीसीएस मिळून तयार करणार

हिंदुस्थान आता टेक्नोलॉजीमध्ये मोठी झेप घेण्याची तयारी करत आहे. देशातील सर्वात मोठा क्वांटम कॉम्प्युटर लाँच केला जाणार आहे. हा कॉम्प्युटर आयबीएम आणि टीसीएस कंपनी मिळून तयार करणार आहे. हा क्वांटम कॉम्प्युटर नॅशनल क्वांटम मिशन अंतर्गत आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये बनवला जाणार आहे. या हायटेक मशीनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात 156 क्यूबीट आयबीएम हेरॉन प्रोसेसर असणार आहे. त्यामुळे कोट्यवधी टास्क एकाचवेळी सुपरफास्ट वेगाने पूर्ण करता येतील. क्वांटम कॉम्प्युटर सध्याच्या कॉम्प्युटरच्या तुलनेत अनेक पट वेगवान असेल. ज्या कॉम्प्युटरसाठी काही कामासाठी काही तास लागतात, ते काम क्वांटम कॉम्प्युटर अवघ्या काही सेकंदांत करेल. हे नवीन क्वांटम कॉम्प्युटर 156 क्यूबिट्ससोबत काम करेल.

क्वांटम कॉम्प्युटर आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये बनवला जाणार आहे. अमरावतीमध्ये एक क्वांटम व्हॅली टेक पार्क बनवला जात आहे. या ठिकाणी कॉम्प्युटरला ठेवले जाईल. अमरावतीला टेक्नोलॉजी हब बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारच्या मिशन अंतर्गत क्वांटम कॉम्प्युटिंग, क्वांटम कम्युनिकेशन, क्वाटंम सेसिंग आणि क्वांटम मटेरियवर फोकस केला जात आहे.

आयबीएमचे हार्डवेअर, तर टीसीएसचे सॉफ्टवेअर

या प्रोजेक्टसाठी अमेरिकेची टेक कंपनी आयबीएम आणि हिंदुस्थानातील आयटी कंपनी टीसीएस या दोन मोठ्या कंपन्या एकत्र आल्या आहेत. आयबीएम कंपनी या क्वांटम कॉम्प्युटरसाठी हार्डवेअर तयार करणार आहे, तर टीसीएस यासाठी खास अल्गोरिदम आणि ऑप्लिकेशन डेव्हलप करणार आहे. हा क्वांटम कॉम्प्युटर केवळ सरकारसाठी बनवला जात नसून देशातील इंडस्ट्री आणि शिक्षण संस्थासाठी उपयोगी ठरणार आहे.