
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी लढतीत टीम इंडियाने आफ्रिकेवर 203 धावांनी विजय मिळवला. या विजयामध्ये दोन्ही डावात शतक झळकावणाऱ्या रोहितसह फिरकीपटू आर. अश्विनने मोलाचे योगदान दिले. अश्विनने या कसोटीत कारकीर्दीतील 350 बळींचा महत्त्वाचा टप्पाही गाठला.
आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीपूर्वी अश्विननला 350 बळींचा टप्पा गाठण्यासाठी 8 बळींची आवश्यकता होती. अश्विनने पहिल्या डावामध्ये 7 बळी घेतले. त्यानंतर पाचव्या दिवशी ब्रूनला बाद करत 350 बळींचा टप्पा गाठला. दोन्ही डावात मिळून 8 बळी घेत अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात हा टप्पा गाठण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.
मुरलीधरनचा विश्वविक्रम
श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याच्या नावावर याआधी सर्वात कमी डावात 350 बळींचा टप्पा (6 सप्टेंबर, 2001) गाठण्याचा विक्रम होता. मुरलीधरनने 66 व्या कसोटीमध्ये हा टप्पा गाठला होता. आता अश्विननेही 66 व्या कसोटीत हा टप्पा गाठल्याने हा विक्रम संयुक्तपणे दोघांच्या नावावर नोंद झाला आहे.
350 Test wickets for Ravichandran Ashwin
He has dismissed Theunis de Bruyn to become the joint-fastest to the milestone alongside Muttiah Muralitharan – in just 66 matches!
Follow #INDvSA LIVE https://t.co/dCGJ4Pcug5 pic.twitter.com/I8XVEaBiLZ
— ICC (@ICC) October 6, 2019
कुंबळे-भज्जीचा विक्रम मोडला
अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांचा विक्रम मोडला आहे. कुंबळेने 77 व्या कसोटीमध्ये, तर भज्जीने 83 आणि कबिल देव यांनी 100 व्या कसोटीमध्ये 350 बळींचा टप्पा गाठला होता. या सर्वांचा विक्रम अश्विनने मोडीत काढला आहे.
























































