अश्विनही चेन्नई सोडण्याच्या विचारात

संजू सॅमसंग राजस्थानची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच चेन्नई सुपर किंग्जलादेखील धक्का बसण्याची शक्यता आहे. ‘फिरकीचा जादूगार’ अशी ओळख असलेला आर. अश्विनदेखील चेन्नईपासून दूर जाण्याची शक्यता आहे. अश्विनने फ्रेंचायझीला रिलीज करण्याची विनंती केल्याचे वृत्त समोर आले आहे.

महान फिरकीपटू आर. अश्विन दहा वर्षांनंतर चेन्नईच्या ताफ्यात परतला होता. त्याने मागील पर्वात 9 सामन्यांत 7 विकेट टिपले आहेत. तो 2015 मध्ये चेन्नईकडून शेवटचा खेळला होता. त्यानंतर तो पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स व राजस्थान रॉयल्स अशा तीन फ्रेंचायझींकडून खेळला. त्याला आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईने 9.75 कोटींत करारबद्ध केले होते. एका क्रिकेट वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून चेन्नईमध्ये बैठका सुरू असून आगामी हंगामाच्या योजनांवर चर्चा केली जात आहे. अश्विनने त्याला रिलीज करण्याची विनंती केली आहे. संजूसाठी अश्विन चेन्नईची साथ सोडत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.