आर माधवनने बीकेसीतील फ्लॅट दिला भाड्याने

बॉलीवूड अभिनेता आर. माधवन आणि त्याची पत्नी सरिता यांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधील आपला आलिशान फ्लॅट दोन वर्षांसाठी भाडय़ाने दिलाय. या फ्लॅटचे महिन्याला भाडे 6.50 लाख रुपये असून आर. माधवनला दोन वर्षात 1.60 कोटी रुपये मिळतील. या फ्लॅटसाठी माधवनला डिपॉझिट म्हणून 39 लाख रुपयेसुद्धा मिळाले आहेत. या भाडेतत्त्वाच्या व्यवहारावर 47 हजारांची स्टॅम्प डय़ुटी आणि 1 हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरले आहे. माधवन आणि पत्नी सरिता यांनी जुलै 2024 मध्ये 17.50 कोटी रुपयांना फ्लॅट खरेदी केला होता.