
कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढू लागलाय. त्यामुळे बॉलीवूडच्या चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात येत आहे. ‘हाथी मेरे साथी’, ‘बंटी और बबली 2’, ‘चेहरे’ आणि ‘सूर्यवंशी’ या चित्रपटांनंतर आता सलमानच्या बहुचर्चित ‘राधे’ या चित्रपटाचेदेखील प्रदर्शन लांबणीवर पडणार असल्याची चिन्हे आहेत.
येत्या ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. कबीर सिंग बेदी यांच्या बुक लाँचवेळी सलमानने यावर वक्तव्य केलं आहे. सलमान म्हणाला, ‘आम्ही अजूनही ‘राधे’ला ईदवर प्रदर्शित करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत, परंतु लॉकडाऊन पुढे सुरू राहिल्यास आम्हाला कदाचित पुढच्या वर्षी ईदला चित्रपट प्रदर्शित करावा लागेल. लोकांनी सगळ्या नियमांचे पालन केलं तर हे सगळं लवकरच संपेल. तसं झालं तरच ‘राधे’ या वर्षी ईदला प्रदर्शित करू.




























































