‘राधे मां’च्या मुलाने निवडले अभिनय क्षेत्र, ओटीटीवरील मालिकेतून करणार पदार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ यांचा मुलगा अभिनय क्षेत्रात त्याचे नशीब आजमावणार आहे. लवकरच ओटीटीवरील एका मालिकेत तो झळकणार आहे. अभिनेता रणदिप हुड्डासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसिरीजमधून तो ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

राधे माँ च्या मुलाचे नाव हरजिंदर सिंह असे आहे. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसिरीजमधून एसटीएफ अधिकाऱ्यांपैकी एकाची भूमिका साकारत आहे. हरजिंदर यांनी यावेळी सांगितले. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ हा एक वेगळ्या धाटणीचा प्रोजेक्ट आहे आणि ही मोठी सिरीज आहे. त्यामुळे प्रत्येक एपिसोडसोबत पात्र अधिक चांगले होत जाते. मी एका तरुण आणि हुशार एसटीएफ अधिकाऱ्याची भूमिका करत आहे, ज्याची नुकतीच यूपीमधील वाढत्या गुन्हेगारी सिंडिकेटचा तपास करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तो आपली क्षमता सिद्ध करण्याचा आणि  छाप सोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे हरजिंदर यांनी सांगितले.

या मालिकेबाबत बोलताना हरजिंदर सिंग सांगतो की, या मालिकेची कथा 90च्या दशकातील उत्तरप्रदेशातील लोकांवर प्रकाश टाकणारी आहे. ही एक फास्ट, अॅक्शन आणि गन ब्लेझिंग सिरीज आहे. ज्यामध्ये तो एसटीएफ पोलिसांपैकी एक असून त्या टिमचा भाग आहे आणि राज्यातील अपराध सिंडिकेट संपवण्यासाठी तयार आहे. एसटीएफ अधिकारी आपल्या भूमिकेसाठी तिथल्या लोकांसोबत चांगल्या पद्धतीने सहभागी होतात आणि लपून राहतात. त्याला जागेच्या हिशोबाने बदलावे लागते. मला तिथल्या लोकांचा टोन आणि देहबोली शिकावी लागली. माझे कपडे 90 च्या दशकाच्या सुरुवातीच्या अनुषंगाने ठेवावे लागले, जिथे पुरुष सैल कपडे घालायचे. हरजिंदरने पुढे सांगितले की, जेव्हा एसटीएफ अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची गरज भासते, तेव्हा अनेक आव्हाने समोर असतात. जे भूमिकेसोबत असतात. या वेबसिरीजसाठी रणदीप हुड्डासोबत काम करत असल्याने खूप आनंदी आहे. रणदीप हुड्डा यांच्यासारख्या कलाकारासोबत काम करायला मिळणे म्हणजे माझे भाग्यच आहे. रणदीप हुड्डा यांच्यासोबत अनेक कलाकार यामध्ये दिसणार आहेत.

करिअरमध्ये हरजिंदर वेगवेगळ्य़ा प्रकारच्या भूमिका करण्यासाठी उत्सुक आहे. यावर त्याने सांगितले की, मी केवळ एका सेलिब्रिटीसारखा नाही एका अभिनेत्याच्या रुपाने पुढे जाऊ इच्छित आहे. मी एका व्यापारी कुटुंबातील आहे ज्याने अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक केली आहे आणि माझ्या कुटुंबाने मला माझ्या स्वप्न साकार करण्यास शिकवले आहे. जर मला अभिनयात रमलो नाही तर मी कौटुंबिक व्यवसायच करेन.