माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद कालवश, नरेगा योजनेच्या अंमलबजावणीत उचलला होता सिंहाचा वाटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
raghuvansh-singh

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचे आज नवी दिल्लीत निधन झाले. निधनसमयी ते 74 वर्षांचे होते. सिंह हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. सिंह यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. रघुकंश यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए -1 मंत्रिमंडळात केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून आपल्या कामाची छाप राजकारणात सोडली होती.

ग्रामीण भागाचा आणि कृषी क्षेत्राचा दांडगा अभ्यास असणारे रघुवंश सिंह हे ज्येष्ठ आरजेडी नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे निकटचे सहकारी म्हणून ओळखले जायचे. यूपीए मंत्रिमंडळात केंद्रीय ग्राम विकास मंत्री म्हणून काम करताना रघुवंश यांनी ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजुरांच्या हितासाठीच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी सिंहाचा काटा उचलला होता. रघुवंश प्रसाद गेल्या 32 वर्षांपासून राजदमध्ये कार्यरत होते. बिहार निवडणूक तोंडावर आलेली असतानाच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. रांचीमध्ये उपचार घेत असलेल्या लालूप्रसाद यादव यांना त्यांनी राजीनामा पाठकला होता. रघुकंश प्रसाद यांचं राजदमध्ये चांगलं वजन होतं. आरजेडी पक्षाला राजकारणात उज्वल यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा काटा होता.