साकुरी शिवारात तीन एकर ऊस आगीत जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। राहाता

साकुरी बाजार समिती जवळ लागलेल्या आगीत तीन एकर उस जळून खाक झाला आहे. शिवारात अज्ञाताने पेटलेल्या बिडीचे थोटूक फेकल्याने ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

साकुरी शिवारात बाजार समिती जवळ सुधाकर दंडवते यांचा गट नंबर 428 मध्य़े तीन एकर ऊस होता. पण अचानक लागलेल्या आगीत तो जळून खाक झाला. आग विझविण्यासाठी राहाता नगर पालिका व शिर्डी नगरपंचायतीच्या अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. पण वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाळा अधिकच भडकल्या. यात तीन एकर ऊस जळून खाक झाला. विषेश म्हणजे उद्या या ऊसाला कारखान्याची तोडही येणार होती ती येण्यापुर्वीच उस जळाला. या उसालगतच दंडवते यांचेच पोल्ट्री फॉर्म आहे. ते मात्र सुदैवाने आगीतून बचावले आहे.