
सामना प्रतिनिधी। राहाता
राहाता येथील चितळी रोड वरील डाळींब व्यापारी घोडे पाटील ट्रान्सपोर्टचे दुकान आगीत जळून खाक झाले आहे. यात सहा लाखाचे नुकसान झाले. दरम्यान, राहाता व शिर्डी नगरपालिकेच्या अग्निशमनदलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चितळी रोड वरील घोडे पाटील ट्रांसपोर्ट या दुकानाला अचानक आग लागली. या आगीत कँरेट, नायलॉन सुतळी, गम टेप इलेक्ट्रॉनीक वजन काटे, तसेच फर्निचर जळून खाक झाले. यात सुमारे सहा लाखाचे नुकसान झाले. रात्री 8.30 वाजेच्या सुमारास दुकानाचे चालक अनिल घोडे हे दुकान बंद करून घरी गेले असता दुकानातून अचानक धtर येत असल्याचे समोर राहाणाऱ्या नागरीकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने राहाता पालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविले. नंतर शिर्डी नगरपंचायतिची अग्निशमक गाडीही दाखल झाली. प्लँस्टीक कँरेट व नायलॉन सुतळी मुळे संपुर्ण दुकान जळून खाक झाले .दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला य़श आल्याने लगतची 10 ते 15 दुकाने या दुर्घटनेतून वाचली.तलाठी भुजबळ यांनी या जळीताचा पंचनामा केला आहे. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही.































































