राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमी प्रमुखपदासाठीचा राहुल द्रविडचा मार्ग मोकळा

हिंदुस्थानी क्रिकेटमधला ‘जंटलमन’ खेळाडू म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीच्या प्रमुखपदी कायम राहणार अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीकडून राहुल द्रविडला हितसंबंधाच्या मुद्यावरून क्लीन चिट देण्यात आली आहे. याप्रसंगी आता हे प्रकरण लोकपाल डी. के. जैन यांच्याकडे गेले असून त्यांनी आम्हाला याबाबत विचारल्यास आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत, असे स्पष्ट मत प्रशासकीय समितीतील रवी थोडगे यांनी यावेळी व्यक्त केले.

राहुल द्रविड हा इंडिया सिमेंट कंपनीचा कर्मचारी असून या कंपनीकडे आयपीएलमधल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा मालकी हक्क आहे. त्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर राहुल द्रविडवर हितसंबंधांचा आरोप ठेवण्यात आला होता. एक व्यक्ती दोन पदांवर कार्यरत राहू शकत नाही. अशाप्रकारचा विरोध यावेळी करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या