
काँग्रेस नेते राहुल गांधी शुक्रवारी राजस्थानच्या पीलीबंगामध्ये शेतकरी महापंचायतमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी तीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरले. सरकार शेतकऱ्यांना मारत आहे, मात्र, हे सरकार चीनसमोर उभएही राहू शकत नाही, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. आपण जनतेला कृषी कायद्याची सत्यता समजावली आहे. जनतेला आता सत्य काय आहे, ते समजल्याचेही ते म्हणाले.
राजस्थान में किसान महापंचायत में देश के अन्नदाता की आवाज को बुलंद करने के लिए पहुंचे श्री @RahulGandhi जी को राजस्थान प्रदेश कांग्रेस नेतृत्व स्मृति चिन्ह के रूप में हल भेंट करते हुए।
कांग्रेस किसानों की हर समस्या का हल निकालने के लिए लड़ाई जारी रखेगी।#RahulGandhiExposesBJP pic.twitter.com/gD60X5K8wR
— Congress (@INCIndia) February 12, 2021
देशाचे रक्षण करणारे शेतकरी आहेत. देशाचे पालनपोषण करणारी शेती हा एका माणसाचा व्यवसाय होऊ देणार नाही. एकाच माणसाच्या हातात शेती जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नव्या कृषी कायद्यामुळे एखादी व्यक्ती, उद्योगपती अमर्याद शेतमाल खरेदी करून त्याचा साठा करू शकतो, हे धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील 40 टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. सरकारला त्यांचा विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.
सरकारने आधी तीनही कृषी कायदे रद्द करावेत, त्यानंतरच त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असेही राहुल यांनी स्पष्ट केले. आम्ही तीनही कृषी कायदे रद्द करून दाखवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लडाखमध्ये फिंगर चारपर्यंत आपले सैन्याचे जवान गस्त घालत होते. आता ते फिंगर 3 वर राहतील. याचाच अर्थ सरकारने ती जमीन चीनला दिली आहे. सरकार शेतकऱ्यांना मारते, मात्र चीनपुढे ते उभे राहू शकत नाही, असा आरोपही राहुल यांनी केला.
नव्या कृषी कायद्यानुसार एकच व्यक्ती देशातील शेतमालाचा भाव ठरवणार आहे. जर मोठे उद्योगपती आणि कंपन्या शेतमाल विकायला लागल्या, तर गरीब शेतकऱ्यांचे काय होणार असा सवालही त्यांनी केला. हे कायदे अंमलात आल्यावर शेतकरी आणि छोटे व्यापारी संपणार असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोरोना महामारीमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारने गरीबांना रेल्वे, बसची मोफत तिकीटे दिली नाहीत. मात्र, त्याचवेळी श्रीमंतांचे 1.50 लाख कोटींचे कर्ज माफ केले, असेही राहुल यांनी सांगितले.





























































