
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मोदी आणि अमित शहा देशात दुही माजवत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच दोघांनीही हिंदुस्थानचे भविष्य नष्ट केल्याचा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी रविवारी देशातील तरुणांना उद्देशून एक ट्वीट केले आहे. ‘मोदी आणि शहा यांनी तुमचे भविष्य नष्ट केले आहे. अर्थव्यवस्थेला पोहोचवलेली हानी आणि घटलेल्या रोजगारामुळे मोदी सरकार तरुणांच्या रागाला सामोरे जाऊ शकत नाही. त्यामुळे ते आपल्या देशात दुही माजवत आहेत आणि तुमच्या मनातल्या त्या तिरस्कारापासून पळ काढत आहेत. आपण प्रत्येक देशवासियांविषयी प्रेम व्यक्त करून त्यांचा पराभव करू शकतो, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.
Dear Youth of ,
Modi & Shah have destroyed your future.They can’t face your anger over the lack of jobs & damage they’ve done to the economy. That’s why they are dividing our beloved & hiding behind hate.
We can only defeat them by responding with love towards every Indian.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 22, 2019
चिदंबरम यांचाही निशाणा
राहुल गांधीसह माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर टीका केली होती. “कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्यासह जे उपाय सरकारनं केले आहेत, ते त्यांच्या जवळ असलेल्या उद्योजकांना मदत करणारे आहेत. खरतर ज्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत गेले. नोकऱ्या गेल्या. कमी उत्पन्न असणाऱ्यांना मदत करण्याची ही वेळ आहे. तळाला असणाऱ्या 25 ते 35 कामगार वर्गाला मदत करण्याची वेळ आहे. पण, सरकारने केवळ 800 कंपन्यांना सरकारनं मदत केली, असे चिदंबरम म्हणाले.
मोदींच्या दोन सहकारी पक्षांसह 9 राज्यांचा नागरिकता सुधारणा कायद्याला विरोध

























































