
केदारनाथचे आशीर्वाद मागणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी भाविकांना भंडारा वाटप केले. गळ्यात रुद्राक्ष माळा, कपाळावर चंदन आणि थंडीपासून मुकाबला करण्यासाठी कानटोपी, जाकीट अशा वेशातील राहुल यांनी भाविकांना अभिवादन करत अन्नवाटप केले. केदारनाथ मंदिरात आरती आणि प्रार्थना केल्यानंतर राहुल सुमारे दोन तास येथील अन्नछत्रात भंडारा वाटप करत होते. या भंडाऱ्याचे आयोजन त्यांनीच केले होते. केदारनाथ मंदिराबाहेर त्यांनी भाविक आणि अनेक साधूसंताशीही संवाद साधला.
























































