राहुल गांधींनी मोदींना ठेवलं नवं नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

भाजपच्या राज्यात दलित आणि आदिवासींवरील वाढत्या हल्ल्यांच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना एक नवीन नावं ठेवलं आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून हे नाव शेअर करत त्यांनी भाजपवर पुन्हा एकदा टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये मोदींचा उल्लेख मि. ५६ असा केला आहे. ”मि. ५६ यांच्या ‘बेस्ट बडी’ने मला भाजपच्या राज्यात दलित आणि आदिवासींविरुद्ध होत असलेल्या अन्यायाबद्दल पडताळणी करायला सांगितलं होतं. मी आशा करतो की मी खाली दिलेल्या लिंकमुळे मि. ५६ आणि त्यांचे बेस्ट बडी (घनिष्ट मित्र) यांना त्यांच्या गाढ झोपेतून जाग येईल आणि तशी ती आली नाही तर मी आणि काँग्रेस ती आणून देऊ” असं ट्वीट करताना राहुल यांनी अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला आहे.

या ट्वीटसोबत त्यांनी इंडिया टुडेचे न्यूजट्वीट जोडले आहे. भाजपच्या सरकारमधील राज्यांमध्ये दलितविरोधी वातावरण वाढत असल्याचं या न्यूजट्वीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.