उद्योगपतींचे अरबो रुपयांचे कर्ज माफ, हाच मोदींचा विकास! राहुल गांधींचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने उद्योगपतींचे जे कर्ज माफ केले त्या रकमेतून देशातील अनेक कुटुंबांचे भले करता आले असते. मात्र तसे घडले नाही. उद्योगपतींचे अरबो रुपयांचे कर्ज माफ करणे हाच मोदींचा विकास आहे, असा हल्लाबोल काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षात उद्योगपतींचे 2378760000000 रुपयांचे कर्ज माफ केले. कोरोनाच्या संकटकाळात एवढय़ा पैशातून देशातील 11 कोटी कुटुंबांना महिन्याला 20-20 हजार रुपये देता आले असते. मात्र तसे घडले नाही. हाच मोदींच्या विकासाचा खरा चेहरा असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.